चंद्रपुर जिल्ह्यात भावी पोलिसाचे दुचाकी वाहन चोरीला

चंद्रपुर जिल्ह्यात भावी पोलिसाचे दुचाकी वाहन चोरीला

Chandrapur police news

चंद्रपूर /राजुरा - जिल्ह्यातील राजुरा शहरात भावी पोलिसाचे दुचाकी वाहन चोरी झाल्याची घटना घडली होती, पोलिसांनी या घटनेचा तपास करीत दुचाकी चोरांना अटक करीत विविध शहरातील तब्बल 16 दुचाकी वाहन जप्त केले.

Bike theft chandrapur



6 सप्टेंबर ला राजुरा शहरातील ज्योतिबा शाळा येथे सोनियानगर निवासी 27 वर्षीय पवन वाडगुरे हा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गेला पवन ने आपले दुचाकी वाहन mh34At3493 शाळेसमोरील गेट पुढे हँडल लॉक करून ठेवली होती. LG कंपनीचा 55 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 42 हजार रुपयांना....त्वरा करा


प्रॅक्टिस आटोपल्यानंतर पवन सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास शाळेतून बाहेर आला असता त्याचे दुचाकी वाहन त्याठिकाणी आढळले नाही, त्याने परिसरात वाहन शोधले मात्र ते कुठेही आढळून आले नाही, आपली दुचाकी चोरीला गेली हे समजले असता दुसऱ्या दिवशी 7 सप्टेंबरला पवन ने राजुरा पोलीस स्टेशन गाठत वाहन चोरीची तक्रार नोंदविली.


पोलिसांनी गुन्हा तपासात घेतला, याबाबत गोपनीय माहिती गोळा करीत आरोपीचा शोध लावला पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कोरपना येथे राहणारा 28 वर्षीय होमेश्वर उर्फ हर्षल नामदेव देवतळे, कोरपना येथील 30 वर्षीय मिलिंद जयभारत डंभारे व राजुरा येथील 24 वर्षीय अल्बास जाएद शेख ला अटक केली.


तिन्ही आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरी केल्याची बाब कबुल केली, पोलिसांनी तिघांकडून तब्बल 17 दुचाकी जप्त करीत तब्बल 8 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि धर्मेंद्र जोशी, पोलीस कर्मचारी खुशाल टेकाम, किशोर तुमराम, सुनील गौरकार, महेश बोलगोडवार, रामराव बिंगेवाड व तिरुपती जाधव यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने