वाहनांवर महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावत गांजाची तस्करी

वाहनांवर महाराष्ट्र शासनाचे स्टिकर लावत गांजाची तस्करी

Pune narcotics news

पुणे - वाहनांवर महाराष्ट्र शासनाची पाटी लावत अवैधपणे गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथक 2 ने अटक करीत तब्बल 520 किलो गांजा पकडला ज्याची एकूण किंमत 1 कोटी 4 लाख रुपये आहे.

Pune narcotics


आंध्रप्रदेश राज्यातून नगर रस्त्यावर रात्री पोलीस गस्तीवर होते, पोलिसांना अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती, त्यामुळे पोलीस अलर्ट होते.


पोलिसांनी सापळा रचत स्कॉर्पिओ व सेलेरिओ वाहनाला थांबविले, वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये तब्बल 520 किलो गांजा बॅग मध्ये पॅक करण्यात आला होता, पोलिसांना गांजा जप्त करीत रायगड येथील 29 वर्षीय संदीप बालाजी सोनटक्के, आंध्रप्रदेश राज्यातील गट्टूर येथील रहिवासी 36 वर्षीय निर्मला कोटेश्वरीमूर्ती जुन्नरी व रायगड येथील 29 वर्षीय महेश तुळशीराम परीट यांना अटक करण्यात आली.


दोन्ही वाहनात गांजा बॅग मध्ये पॅक करून टाकण्यात आला होता व वाटेत कुणी अडवू नये यासाठी महाराष्ट्र शासनाचे स्टिकर वाहनांवर लावण्यात आले होते, मात्र आरोपींची ही युक्ती फसली व ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमदंडी व संदीप जाधव यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने