राज्यात सैराटची पुनरावृत्ती

राज्यात सैराटची पुनरावृत्ती

Maharashtra sairat incident

छत्रपती संभाजीनगर - प्रेम संबंधाला विरोध करीत भावांनी बहिणीवर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना राज्यात घडली आहे, सैराट चित्रपटाप्रमाणे पुन्हा ऑनर किलिंग सारखी घटनेने राज्य हादरले आहे.
Sairat incident maharashtra




जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही घटना घडली आहे, या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


35 वर्षीय चंद्रकला बावस्कर रा. तोंडापुर तालुका जामनेर असे मृतक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरदापुर पोलिसांनी मृतकाचा भाऊ कृष्णा बावस्कर, शिवाजी बावस्कर, वडील धोंडिबा बावस्कर व आई शेवंता बावस्कर विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.


अशी घडली घटना

मृतक चंद्रकला हिचे प्रेम संबंध असल्याचा संशय आई-वडील व दोघा भावांना होता, शनिवारी राक्षा शिवारात 30 वर्षीय शमीम शाह हे शेतात काम करीत असताना चंद्रकला धावत पळत त्यांच्याकडे आली मला माझे कुटुंबीय ठार करणार, प्रेम संबंधाच्या कारणावरून मला जीवे मारण्यासाठी कुटुंब शोधत आहे माझी मदत करा अशी आर्त विनवणी चंद्रकला ने शमीम ला केली असता त्यांनी शेत शिवारातील बकऱ्याच्या गोठ्यात चंद्रकला ला लपविले.

थोड्या वेळात चंद्रकला चे भाऊ व आई-वडील तिथे पोहचले व चंद्रकला बाबत शमीम ला विचारणा केली असता शेत शिवारात तिला शोधायला लागले, काही वेळाने बकऱ्याच्या गोठ्यात लपलेल्या चंद्रकला ला भावाने बाहेर काढत तिला मारहाण करणे सुरू केले, वडील व आई तिथे पोहचताच तिला जिवंत सोडू नका असे सांगितले.

दोघा भावांनी कुऱ्हाडीने चंद्रकला च्या डोक्यात वार करीत तिला ठार केले, सोबत शमीम ला सुद्धा मारहाण केली, शमीम कसाबसा तिथून जीव वाचवीत पळाला, व तात्काळ पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदविली.

फरदापुर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करीत मृतदेह शवं विच्छेदन साठी पोलिसांनी रुग्णालयात पाठविला व चंद्रकला चे भाऊ व आई-वडील विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने