मुंबईत Air Hostess ची हत्या

मुंबईत Air Hostess ची हत्या

Mumbai news

मुंबई - विमान कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय हवाई सुंदरीची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

Air hostess murder


मुंबई येथील पवई भागांतील विमान कंपनीत 23 वर्षीय रुपल ओगरे रा. छत्तीसगड ही हवाई सुंदरी म्हणजे air hostess म्हणून कामाला होती, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अंधेरी उपनगरातील मरोळ इथल्या NG कॉम्प्लेक्स मध्ये रुपल आपल्या बहीण व मित्रांसोबत राहत होती.


ज्यावेळी रुपल ची हत्या झाली तेव्हा ती घरी एकटीच होती, तिची बहीण आणि मित्र हे गावी गेले होते, रुपल चा गळा निर्घृणपणे चिरण्यात आला आहे.


पवई पोलीस व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करीत तपासाला सुरुवात केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने