चंद्रपूर जिल्हा हत्येच्या घटनेने हादरला

चंद्रपूर जिल्हा हत्येच्या घटनेने हादरला

Chandrapur crime news

मूल - तालुक्यातील डोनी गावात 14 सप्टेंबरला गावातील सभागृहात गावातील एकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली होती, याबाबत मूल पोलिसांना सूचना दिली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

Murder crime



पोलिसांनी पंचनामा केला असता गावातील सभागृहात डोनी मध्ये राहणारे 55 वर्षीय अमृत अलाम यांची हत्या करण्यात आली होती, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता अवघ्या काही तासात मूल पोलिसांनी आरोपीला अटक केली.


घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविला, त्यानंतर गावात अलाम यांच्याबद्दल विचारणा केली असता डोनी गावातील विजय पाल अलाम यांच्यासोबत अमृत चा मागील काही वर्षांपासून शेतीचा वाद सुरू होता.


त्या वादातून विजय अलाम याने अमृत ला गावातील सभागृहात बोलावीत भांडण केले मात्र या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले असता विजय ने अमृत चा गळा आवळून खून केला.


त्यानंतर मृतदेह सभागृहात टाकून पळ काढला, पोलिसांनी आरोपी विजय ला काही तासात पकडले, विजय हा मृतक अमृत चा नातेवाईक होता. 


सदर गुन्ह्याचा छडा पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बनसोड, पोलीस कर्मचारी शफिक शेख, चिमाजी देवकथे व सुधीर उईके यांनी लावला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने