माझ्यासोबत लग्न करतोयं की नाही...प्रेयसिने दिली धमकी आणि घडलं भयानक

माझ्यासोबत लग्न करतोयं की नाही...प्रेयसिने दिली धमकी आणि घडलं भयानक

Jalgaon crime news

जळगाव - प्रेम संबंध ठेवून लग्नास टाळाटाळ केल्याने प्रेयसिने प्रियकरावर चाकू हल्ला करीत प्रियकराला जखमी केले.


Crime news

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ही घटना घडली, प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे.


तलाठी कॉलॉनीत राहणाऱ्या निलेश बोरसे चे एका तरुणीसोबत मागील 2 ते 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र या नात्यात दोघांचे नेहमी भांडण होत होते.


तरुणीने निलेश ला लग्न करण्यासाठी तगादा लावला, मात्र निलेश लग्नासाठी प्रतिसाद देत नव्हता यामुळे संतप्त झालेल्या प्रेयसिने माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला व तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली होती.


मात्र निलेशने प्रेयसीच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही, यामुळे शनिवारी रात्री च्या सुमारास तरुणी निलेश च्या घरी पोहचली, लग्न करतो की नाही अशी धमकी देत प्रेयसिने निलेशवर चाकूने हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्यात निलेश घाबरला निलेशला कुटुंबाने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.


प्रेयसी विरोधात पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने