गरोदर महिलेला निर्वस्त्र करीत मारहाण

गरोदर महिलेला निर्वस्त्र करीत मारहाण

Rajasthan crime

राजस्थान - प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड जिल्ह्यामध्ये एका गर्भवती महिलेला निर्वस्त्र फिरवीत धिंड काढल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे. महत्वाची बाब म्हणजे पीडित महिलेच्या पतीनेच तिला निर्वस्त्र करीत गावकऱ्यांसमोर 1 किलोमीटर पळायला लावले.


Rajasthan crime


31 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली, या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह 3 जणांना अटक केली आहे.

प्रकरण काय आहे?

पीडित महिलेचा विवाह या गावातील एका तरुणासोबत दीड वर्षांपूर्वी झाला होता, लग्नाला 6 महिने लोटल्यावर दुसऱ्या गावातील युवकांसोबत महिलेचे प्रेम संबंध जुळले, उपला कोटा गावातील तरूणा सोबत महिला पळून गेली होती, तब्बल वर्षभरानंतर महिला गावात आली, याची माहिती सासरच्या मंडळींना लागली होती.
त्यावेळी जबरदस्तीने सासरच्या मंडळींनी महिलेला परत आणले.


सासरच्या लोकांनी पीडित महिलेला पहाडा गावात आणले, पत्नी दुसऱ्या सोबत पळून गेली म्हणून पतीने तिचे कपडे काढत निर्वस्त्र केले, आणि तिची गावात धिंड काढली, पीडित महिला ओरडत विनवणी करीत मदतीसाठी नागरिकांना हाक मारत होती मात्र नागरिकांनी मदत करण्याऐवजी तिचा व्हिडीओ बनविला.


पीडित महिला ही 6 महिन्याची गर्भवती आहे, महिलेला तिच्या पतीने मारहाण करीत पळायला लावले, यानंतर त्या महिलेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि प्रशासन जागे झाले, महिलेने रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथक दाखल करीत महिलेच्या पतीसह तिघांना जंगलातून अटक केली, महिलेने 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे.

या घटनेची दखल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतली व या प्रकरणातील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने