चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभागात चोर मचाए शोर

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभागात चोर मचाए शोर

Chandrapur burglary crime

चंद्रपूर - शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजे बाबूपेठ, या भागात अवैध धंदे व गुन्हेगारी हळूहळू वाढत चालली आहे, या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे काम शहर पोलिसांमार्फत सुरू आहे


Chandrapur burglary crime


बाबूपेठ भागात राहणारे 61 वर्षीय अरुण महादेव जोगी हे बाहेर गावी गेले होते, परत आल्यावर त्यांच्या घरातील कुलूप तोडण्यात आले होते, आत सामान अस्ताव्यस्त अवस्थेत होते, त्यांनी अलमारी उघडून बघितली असता त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 33 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल गायब होता.

घरी कुणीतरी अज्ञातांनी चोरी केली असा संशय आल्यावर जोगी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसात तक्रार दिल्यावर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथकाने तपास हाती घेतला.

सदर घरफोडिची घटना ही 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान झाली होती, पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातून संपूर्ण माहिती काढली, गोपनीय माहितीचा आधार घेतला असता त्यावेळी 2 इसम हे दागिने विक्री करीता फिरत असल्याची माहिती मिळाली.

लगेच गुन्हे शोध पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनी जोगी यांच्या घरी घरफोडी केली असल्याचे कबूल केले, आरोपी 24 वर्षीय मयूर मधुकर कांबळे व 25 वर्षीय सैफ उर्फ अहमद शब्बीर कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

आरोपिकडून दागिने जप्त करण्यात आले, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सपोनि मंगेश भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, इम्रान खान, संतोष पंडित, जयंता चुनारकर, विलास निकोडे, रूपेश रणदिवे व शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने