गोवंश तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गोवंश तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Cattel smuggling chandrapur

चंद्रपूर - जिल्ह्यातील विरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गोवंश जनावरांना कत्तलीसाठी नेत असलेल्या चारचाकी वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडून 30 गोवंश जनावरांची मुक्तता केली.

Cattle smuggler chandrapur


12 सप्टेंबर ला स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे वाहनात कोंडून नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विरुर पोलीस स्टेशन हद्दीत पाठविले.

सोनूर्ली फाट्याच्या आधी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला असता 16 चाकी वाहन पोलिसांना दिसले, पोलिसांनी वाहनांच्या चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला, चालकाने वाहन थांबवित तिथून पळ काढला.


स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 20 गाय, 10 बैल व 1 गोवंश जनावर मृत अवस्थेत होते, पोलिसांनी ट्रक क्रमांक TS12UD9233 ताब्यात घेतला, ट्रक चालकविरुद्ध विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


स्थानिक गुन्हे शाखेने सर्व गोवंश जनावरांची मुक्तता केली, या प्रकरणी तब्बल 24 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस कर्मचारी सुरेंद्र महातो, दीपक डोंगरे, गणेश मोहूर्ले, दिनेश अराडे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी व जयसिंग यांनी केली, प्रकरणाचा पुढील तपास विरुर पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने