चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 5 किलो गांजा

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 5 किलो गांजा

Chandrapur Narcotics raid

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थ विक्री व बाळगणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.


Narcotics raid


पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी अंमली पदार्थ विक्री व बाळगणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबवित पथक तयार केले, या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 3 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


स्थानिक गुन्हे शाखेला 1 सप्टेंबर ला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम हे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहे, माहितीच्या आधारे कोंडावार यांनी पोउपनी अतुल कावळे यांच्या नेतृत्वात पथक कारवाईसाठी रवाना केले.


चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावरील बजाज विद्या भवन समोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH33 AC1101 उभे होते, पोलिसांनी पंचासमक्ष त्या वाहनात हजर असलेल्या इसमाना विचारणा केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.


पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये असलेल्या प्लॅस्टिक पन्नी मध्ये तब्बल 5 किलो 213 ग्राम गांजा आढळून आला, पोलिसांनी गांजा जप्त करीत वाहनात आलेल्या तिघांना अटक केली.


गडचिरोली जिल्ह्यातील 18 वर्षीय यश राज दुर्योधन, 21 वर्षीय नेहाल इकरार ठाकूर व 32 वर्षीय सगीर खान ननुआ खान हल्ली मुक्काम गडचिरोली, रा. उत्तरप्रदेश या आरोपीना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याजवळील गांजा किंमत 52 हजार 130 रुपये, 3 मोबाईल किंमत 97 हजार चारचाकी वाहन किंमत 15 लाख असा एकूण 16 लाख 49 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनी अतुल कावळे, शकील शेख, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, नितेश महात्मे, जमीन पठाण, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, रुषभ बारसिंगे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने