चंद्रपुरात दहशत माजविण्याचा प्रयत्न

चंद्रपुरात दहशत माजविण्याचा प्रयत्न

Chandrapur local crime branch

चंद्रपूर - गुन्हेगारी क्षेत्रात आपली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी नव्याने गुन्हेगार विविध उपाय करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र चंद्रपूर पोलीस अश्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम करीत आहे.
Chandrapur local crime branch




असाच चंद्रपुरातील एक गुन्हेगार दहशत माजविण्याच्या प्रयत्नांत होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेने आधीच त्या गुन्हेगारांवर कारवाई केली.

चंद्रपुरात पोळा व तान्हा पोळा निमित्त शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने ऑल आऊट मोहीम राबविली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत गुन्हेगारांची शोधमोहीम राबविली.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिळाली बियाणी नगर येथे एकाने तलवार घरी लपून ठेवली आहे.

छत्रपती नगर वार्ड क्रमांक 2 येथे बियाणी नगर येथे राहणाऱ्या भूषण मोतीलाल उसरेटी याच्या घरी झडती घेतली असता त्याच्या जवळ पोलिसांना बेडरूम मधील दिवानच्या खाली लपविलेली स्टील ने बनलेली तलवार आढळली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ती स्टील ची तलवार किंमत अंदाजे 5 हजार जप्त करीत आरोपी भूषण ला अटक केली, भूषण उसरेटी वर अवैध दारूविक्री चे गुन्हे दाखल आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, नितीन रायपुरे व गोपाल आतकुलवार यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने