चंद्रपूर जिल्ह्यात 52 वर्षीय नराधमाचा 6 वर्षीय मुलीवर अत्याचार

चंद्रपूर जिल्ह्यात 52 वर्षीय नराधमाचा 6 वर्षीय मुलीवर अत्याचार

Chandrapur crime update

चंद्रपूर /तळोधी (बा.) - नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जनकापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर एका 52 वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली होती. नागभीड पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

Minor girl raped




पहिल्या वर्गात शिकणारी सहा वर्षीय मुलगी आज रविवार असल्यामुळे घरीच होती. आई-वडील कामानिमित्ताने शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत सुधाकर महादेव निमगडे (वय 52) जनकापूर याने मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून गावच्या चौकातील दुकानात घेऊन गेला.


आरोपी आणि पिडित मुलीच्या कुटुबांचे चांगले संबंध असल्यामुळे मुलीनेही आरोपीवर विश्वास टाकला. दुकानातून चॉकलेट घेतल्यानंतर आरोपीने मुलीस तिच्या घरी सोडले. मात्र घरी कोणी नसल्याची संधी साधून नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला.


त्याचे हे दुष्कृत्य सुरू असतांना पिडित मुलीचा 12 वर्षीय भाऊ घरी आला. त्याच्या नजरेस हे दृश्य पडताच त्याने पोलिस पाटलाचे घर गाठून घटनेची माहिती पोलिस पाटलास दिली. पोलिस पाटलांनी लगेच नागभीड पोलिस ठाण्यास ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस अटक करण्यात केली.


आरोपीविरोधात भादंविच्या विविध कलम आणि पास्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने