12 दुचाकी सहित 2 आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

12 दुचाकी सहित 2 आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Chandrapur local crime branch

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात सतत होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना निर्देश दिले होते.

chandrapur police
स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या 12 दुचाकी


पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानंतर महेश कोंडावार यांनी विशेष पथक नेमत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू केली.


स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेगाव येथील चारगाव बु. येथे आढळले, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे 33 वर्षीय राजू बालाजी धुर्वे रा. अर्जुनी कोकेवाडा, वरोरा व 31 वर्षीय प्रशांत उर्फ भोला कवडुजी गाते शिवाजी नगर भद्रावती यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी अनेक दुचाकी चोरीच्या घटनेची कबुली दिली.


स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी जवळून तब्बल 12 दुचाकी जप्त केल्या ज्यामध्ये भद्रावती, वरोरा, चिमूर, सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी, संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, संतोष एलपूलवार, धनराज करकाडे, अजय बागेसर, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, प्रशांत नागोसे, रुषभ बारसिंगे, सीसीटीनएस चे गोपाल पिंपलशेंडे व सायबर पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने