प्रेयसीने केली प्रियकराच्या मुलाची हत्या

प्रेयसीने केली प्रियकराच्या मुलाची हत्या

Delhi crime news

दिल्ली - लग्न झाल्यावर सुद्धा एकाने दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिला, मात्र प्रियकर हा पत्नीपासून घटस्फोट घेत नसल्याने प्रेयसीने प्रियकराच्या अल्पवयीन मुलाची हत्या केली.

ही थरारक घटना देशाची राजधानी दिल्ली येथील इंदरपुरी मधील जेजे कॉलोनी मध्ये घडली.

live in relationship


24 वर्षीय आरोपी पूजा कुमारी व जितेंद्र यांचे प्रेमसंबंध होते, मात्र जितेंद्र हा आधीच विवाहित असताना सुद्धा वर्ष 2019 मध्ये त्याने आर्य मंदिरात पुजा सोबत लग्न केले, मी लवकर पत्नीला घटस्फोट देणार त्यानंतर आपण कोर्टात लग्न करू असे आश्वासन जितेंद्र ने पूजा ला दिले होते.

त्यानंतर जितेंद्र व पूजा दोघेही भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले, मात्र काही काळानंतर दोघांचे भांडण व्हायला लागल्याने जितेंद्र ने पत्नीला घटस्फोट देण्यास नकार देत पूजा ला सोडून पत्नी कडे राहायला गेला.

जितेंद्र सोडून गेल्याने पूजा भयंकर संतापली होती, जितेंद्र ला अद्दल घडविण्याची योजना तिने मनात आणि, 10 ऑगस्टला पूजा जितेंद्र च्या घरी पोहचली, घराचा दरवाजा उघडा असल्याने, तिने आत प्रवेश केला असता जितेंद्र चा 11 वर्षीय मुलगा दिव्यांश हा झोपला होता, पूजाने दिव्यांश चा गळा आवळून खून करीत त्याचा मृतदेह बेड च्या खाली असलेल्या डब्यात ठेवलं तिथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, आरोपी पूजा ला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले, आणि अखेर पूजा ला पोलिसांनी अटक करून तिच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

लग्न होऊन सुद्धा जितेंद्र दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला मात्र वडिलांच्या प्रेमाची किंमत मुलाला मोजावी लागली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने