Online Shopping Company Amazon च्या मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

Online Shopping Company Amazon च्या मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

Delhi crime news

नवी दिल्ली - Amazon India चे सिनियर मॅनेजर हरप्रित गिल यांची मंगळवारी रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.


Amazon manager shot dead


मृतक हरप्रित गिल हे Online shopping company amazon चे सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत होते.

मंगळवारी रात्री च्या सुमारास हरप्रित हे मित्र गोविंद सोबत दुचाकी वाहनाने घरी जाण्यासाठी निघाला होता, दोघे 8 नंबर गल्लीच्या वळणावर पोहचले असताना त्याचवेळी स्कुटी वर आलेल्या दोघांनी हरप्रित व गोविंद ला थांबविले, व बंदूक काढत दोघांवर गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात हरप्रित चा जागीच मृत्यू झाला तर गोविंद हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे, गोळ्या झाडल्यावर अज्ञात आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी हरप्रित चा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला, त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करीत आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने