फळ विक्रेता हसला आणि मनाला थरकाप उडविणारा गुन्हा घडला

फळ विक्रेता हसला आणि मनाला थरकाप उडविणारा गुन्हा घडला

Nanded crime news

नांदेड - नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी मनाला थरकाप उडविणारी घटना घडल्याने नागरिक दहशतीमध्ये आले.

nanded crime news
नांदेड मध्ये थरारक गुन्हा


भाग्यनगर भागातील D-Mart जवळ आठवडी बाजारात भर दुपारी फळ विक्रेता व लसूण विक्रेत्यामध्ये किरकोळ वाद झाला, मात्र लसूण विक्रेत्याने कोयत्याने फळ विक्रेत्याचे दोन्ही हात छाटले.

बुधवारी फळ विक्रेता मोहम्मद अझर मोहम्मद अजीज हा आठवडी बाजारात फक विकत होता, त्यावेळी लसूण विकण्यासाठी आलेला मोहम्मद तोहीद हा हातगाडीवर लसूण विक्री करीत असताना मोहम्मद अझर हा तोहीद ला बघून हसला, माझ्याकडे बघून का हसला म्हणून दोघांमध्ये वाद झाला, वाद एवढा वाढला की तोहीद ने बाजारातून कोयता विकत आणत त्याला धार लावली व 4 वाजता तो पुन्हा आठवडी बाजारात आला असता त्याने अझर चे दोन्ही हात मनगटापासून कोयत्याने छाटले.

त्यानंतर तोहीद ने अझर च्या पाठीवर व पायावर कोयत्याने वार करीत तिथून पसार झाला, जखमी अझर ला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून भाग्यनगर पोलीस आरोपी तोहीद चा शोध घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने