तो शेतात जाण्यासाठी निघाला पण घडलं भयानक

तो शेतात जाण्यासाठी निघाला पण घडलं भयानक

Accident news


मूल (गुरू गुरनुले) : शेतावर जाण्यासाठी निघालेल्या एका दुचाकी स्वाराच्या दुचाकीला चारचाकी वाहन चालकाने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना मूल-सावली मार्गावरील चिमठा नदीजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली.


Accident news


विवेक नामदेव कन्नाके वय 30 वर्षे रा. चकमानकापूर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव आहे.
सावली तालुक्यातील चक मानकापूर येथील विवेक नामदेव कन्नाके यांची शेती मूल तालुक्यातील नलेश्वर येथे आहे.


मंगळवारी सकाळी शेतावर दुचाकी क्रं. एम एच 34 बि एन 1406 ने जात होता तर वर्धा येथील विनोद लक्ष्मण आगरेकर वय 50 वर्षे हे चारचाकी वाहन क्रं. 32 ए एस 6567 ने गडचिरोली येथे जात होते, दरम्यान चिमटा नदीजवळ चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने दुचाकीला धडक दिली, या भिषण अपघातात दुचाकी चालक विवेक नामदेव कन्नाके याचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान मृतकावर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.


घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनल देण्यात आली, वाहन चालकावर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 304 (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने