दुचाकी वाहन चोरणाऱ्या नांदेड गॅंग च्या रामनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दुचाकी वाहन चोरणाऱ्या नांदेड गॅंग च्या रामनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chandrapur crime news



चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील युवक शिक्षणासाठी चंद्रपुरात आला, महाविद्यालयात जाने येने सोपी व्हावे यासाठी त्याने सोबत आपले दुचाकी वाहन आणले मात्र तो युवक बाहेरगावी गेला असता त्याची दुचाकी कुणीतरी चोरली, त्याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली, तपास हाती घेतला असता पोलिसांच्या हाती बाईक चोरणारी मोठी गॅंग लागली.

Bike theft gang
7 दुचाकी 5 आरोपी, रामनगर पोलिसांची धडक कारवाई



रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 18 वर्षीय युवक हर्ष ठुसे यांनी 20 ऑगस्टला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, सायंकाळी 6 वाजता गजानन मंदिर वॉर्ड येथील घरी ठेवलेली रॉयल एनफिल्ड बुलेट बाईक क्रमांक MH40B W 8999 ही कुणीतरी अज्ञाताने चोरी केली.


रामनगर पोलिसांनी कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, बाईक चोरी गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय माहिती घेतली असता पोलिसही थक्क झाले होते.


नांदेड जिल्ह्यातील 5 युवक चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी वाहने चोरी करण्यासाठी येत होते, विशेष म्हणजे 5 पैकी 3 आरोपी वाहन चोरी करायचे व दोघेजण ते विकण्यासाठी जात होते, पोलिसांनी अथक परिश्रम घेत आरोपी मोहसीन रफिक शेख, रा. सारखणी जिल्हा नांदेड, साहिल अनिस शेख दहेली, अकबर गफार शेख, दहेली, अरषद आसिफ शेख सारखणी व आकाश नामदेव गुरनुले करंजी जिल्हा नांदेड यांना अटक करण्यात आली.

आरोपी जवळून पोलिसांनी 7 दुचाकी वाहने ज्यामध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 3 दुचाकी, पोलीस स्टेशन गडचांदूर व कोरपना येथील 1 व गुन्ह्यात वापरलेले 2 दुचाकी जप्त असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने