उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून घडलं भयानक

उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून घडलं भयानक

Parbhani crime news

परभणी - उपसरपंच पदाचा राजीनामा न दिल्याने सरपंचासह इतर जणांनी उपसरपंच यांच्या घरावर हल्लाबोल करीत मारहाण केली या मारहाणीत उपसरपंच यांच्या मुलाचा मृत्यू झाला.


Upasarpanch's family beat
मृत निखिल कांबळे


सदर घटना सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे घडली, या प्रकरणी सरपंच सहित इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे व कौशिबाई डोईफोडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


ब्राह्मणगावातील सरपंच साधना डोईफोडे यांनी उपसरपंच शशिकला कांबळे यांच्यावर पदाचा राजीनामा देण्यासाठी मागील काही दिवसांपासून दबाव टाकत होत्या.
या कारणामुळे सरपंच या संतापल्या होत्या, रागाच्या भरात त्यांनी उपसरपंच कांबळे यांच्या घरावर हल्ला करीत मारहाण केली, वाद सोडविण्यासाठी पुढे आलेल्या कांबळे यांच्या मुलगा निखिल याला जबर मारहाण करण्यात आली, या मारहाणीत निखिल यांचा मृत्यू झाला.


या घटनेबाबत उपसरपंच शशिकला कांबळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ 5 जणांवर गुन्हा दाखल केला, घटनेचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील ओव्हळ हे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने