चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला 11 हजारांची लाच घेताना अटक

चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला 11 हजारांची लाच घेताना अटक

Acb trap
चंद्रपूर - शेत जमिनीवर नाव कमी करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने 15 हजारांची लाच मागितली होती, लाचलुचपत विभाग चंद्रपूरने लाच घेताना तलाठी ला रंगेहात पकडल्याने महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

acb trap
तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला अटक


सध्या राज्यात लाखोंचा पगार असलेले अधिकारी गोरगरीब सामान्य नागरिकांकडून हजारो रुपये उकळण्याचे काम करीत आहे, काही जण या भ्रष्टाचाराला बळी पडतात पण काहीजण याला विरोध करतात, असेच एक प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडले आहे.

फिर्यादी गडचिरोली जिल्हा परिषद मधील सेवानिवृत्त कर्मचारी आहे, सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात कुटुंबासहित राहतात, फिर्यादी तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अडेगाव देशमुख येथे 284 हे.आर.चौ.मी शेतजमीन आहे.
त्या शेतजमिनीवर फिर्यादी यांच्या आत्याचे नाव, आत्याने स्वतः हक्कसोड पत्र ते सुद्धा बिन मोबदला बाबत दुय्यम निबंधक श्रेणी1 या कार्यालयात नोंदणी केली होती.

त्या शेत जमिनीवर फिर्यादी व त्याच्या भावाचे नाव जशेच्या तसे व आत्याचे नाव वगळायचे होते, मात्र या कामासाठी तलाठी राजू रग्गड यांनी फिर्यादी यांना 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

फेरफार च्या क्षुल्लक कामाकरिता 15 हजार रुपये लाच देण्याची फिर्यादी यांची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर मध्ये तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी झाल्यावर सापळा रचण्यात आला, 8 ऑगस्टला तडजोडीअंती तलाठी राजू रग्गड यांनी 11 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती, तलाठी कार्यालय चिमूर येथील लेक्चरर कॉलोनी पाचभाई यांच्या घरी किरायाने असलेल्या कार्यालयात आरोपी राजू रग्गड यांना 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

सदर प्रकरणी मंडळ अधिकारी सुनील महादेव चौधरी यांनी फिर्यादी यांना लाच देण्यासाठी अपप्रेरीत केले होते, त्यावरून दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

सदर यशस्वी सापळा कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, उप पोलीस अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, अमोल सीडाम यांनी पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने