वंदे भारत एक्सप्रेस वर दगडफेक

वंदे भारत एक्सप्रेस वर दगडफेक

Vande bharat express

मध्यप्रदेश - वंदे भारत एक्स्प्रेस वर दगडफेक करीत काचा फोडल्याने प्रवासी चांगलेच घाबरले, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली मात्र त्याचा कबुलीजबाब ऐकल्यावर रेल्वे पोलिसही चक्रावून गेले.

Vande bharat express


दिल्ली- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस वर रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका युवकाने दगडफेक करीत काचा फोडल्या, या घटनेमुळे प्रवासी चांगलेच घाबरले होते.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला, मुरैना जिल्ह्यातून सीसीटीव्ही च्या आधारे रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या फिरोज खान नामक युवकाला अटक केली.

दगडफेकी बाबत आरोपी फिरोज ला विचारणा केली असता त्याने सांगितले की रेल्वे वर दगडफेक केल्याने मला आनंद मिळतो, हा माझा नित्याचा छंद झाला आहे.

पोलिसांनी आरोपी फिरोज विरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने