तर मी 15 ऑगस्टला माझ्या कुटुंबासहित... पत्रकार संदीप महाजन यांचा सरकारला इशारा

तर मी 15 ऑगस्टला माझ्या कुटुंबासहित... पत्रकार संदीप महाजन यांचा सरकारला इशारा

Jalgaon news

जळगाव/पाचोरा - पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपले समर्थक गुंडाच्या माध्यमातून मला मारहाण केली, मला झालेल्या मारहाणीच्या तक्रारींवर पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मी माझ्या कुटुंबासह आत्महत्या करणारा असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे.

journalist sandip mahajan
15 ऑगस्टला मी माझ्या कुटुंबासहित आत्महत्या करणार


2 दिवसांपूर्वी संदीप महाजन यांना भर चौकात मारहाण करण्यात आली होती, ती मारहाण आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असा आरोप महाजन यांनी केला होता.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री शिंदे यांना व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती, मात्र त्यावर मुख्यमंत्री यांनी मी बघतो अशी प्रतिक्रिया दिली होती, त्याबाबत पत्रकार महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी अश्या आशयाची बातमी लावली होती, त्या बातमीवर आमदार पाटील यांनी महाजन यांना कॉल करीत मारहाण करण्याची धमकी दिली होती.

2 दिवसांनी पत्रकार महाजन यांना भर चौकात मारहाण करण्यात आली, सत्तेचा माज चढल्याने आता जनप्रतिनिधीं यांना कायद्याची भीती राहिली नाही, पत्रकार महाजन यांना झालेल्या मारहाणीचा राज्यातील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे.

पोलिसात तक्रार देऊनही प्रशासन कारवाई करीत नसल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला असून सध्या मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या कुटुंबसहितआत्महत्या करणार तेही 15 ऑगस्ट ला असा इशारा महाजन यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने