Rummy Circle पैसे हरला आणि केला हा गुन्हा

Rummy Circle पैसे हरला आणि केला हा गुन्हा

Thane crime news

ठाणे - online rummy circle गेम च्या नादात एक युवक कर्जबाजारी झाला, कर्ज फेडण्यासाठी त्याने गुन्हा केला मात्र त्या गुन्ह्यात तो अडकला.



ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागात हा प्रकार घडला, नितीन ठाकरे या तरुणाला रमी सर्कल गेम चे व्यसन लागले होते, या गेममध्ये त्याने हजारो पैसे गमविले, मात्र आता आपण जिंकणार असा विश्वास त्याला होता यासाठी त्याने बाहेरून कर्ज घेत पुन्हा रमी खेळायला सुरुवात केली.

मात्र यंदा सुद्धा तो पैसे हरला, हजारो रुपये हरल्यावर कर्ज घेत नितीन लाखो रुपये हरला, आता बाहेरून घेतलेले पैसे परत कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला.

त्याला कर्ज फेडण्याचा मार्ग सापडत नसल्याने गुन्हा करण्याची युक्ती त्याला सुचली, डोंबिवली च्या पूर्वेला राहणाऱ्या 70 वर्षीय महिला सुवर्णा नेगी या खरेदीसाठी डोंबिवली पश्चिम मध्ये गेल्या, त्या पादचारी पुलावर येत असताना एका युवकाने त्यांच्या गळ्यात असलेले मंगळसुत्र हिसकावले, त्यानंतर तो पळून जाण्याच्या बेतात होता मात्र रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी त्याला पकडत बेदम मारहाण केली व पोलिसांना माहिती त्यांच्याकडे सोपविले.

नितीन ठाकरे याला रमी या जुगाराचे व्यसन लागले यासाठी कर्ज घेत खेळ खेळला मात्र यामध्ये तो हरला, कर्ज परत कसे करायचे म्हणून त्याने 70 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला आणि नितीन ची थेट तुरुंगात रवानगी झाली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने