दारू पिण्यासाठी पैसे चोरले म्हणून दिली भयावह शिक्षा

दारू पिण्यासाठी पैसे चोरले म्हणून दिली भयावह शिक्षा

Tripura crime news

त्रिपुरा - दारू पिण्यासाठी अल्पवयीन मुलांसोबत एकाने दुकानातून पैसे चोरले, मात्र ही बाब लोकांना कळताच त्यांनी अल्पवयीन मुलांना सोडत एका मुलाचे मुंडन करीत त्याला व त्याच्या आईला विवस्त्र करून मारहाण केली.

Beaten by the mob
जमावाने आई व मुलाला विवस्त्र करीत केली मारहाण


21 ऑगस्टला आगरतला येथील शनमुरा गावात ही घटना घडली, पीडित महिलेच्या मुलाने दारू पिण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांसोबत एका दुकानातून पैसे चोरले, नंतर ही बाब स्थानिक नागरिकांना कळली असता त्या मुलाला पकडून मारहाण करण्यात आली.

महिलेने मुलाच्या चुकीबद्दल पंचायत ला माफी मागितली व चोरलेले पैसे परत देतो असे सांगितले मात्र काही पंचायत सदस्यांनी ग्रामस्थांना भडकवीत मुलाला मारहाण करण्यास सांगितले.

जमावाने महिलेच्या मुलाला बेदम मारहाण करीत त्याचे मुंडन केले, महिला मुलाला सोडविण्यासाठी गेली असता तिला सुद्धा मारहाण करीत विवस्त्र केले, सदर बाब पोलिसांना कळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेत जमवातून आई-मुलाला बाहेर काढले.

मुख्यमंत्री माणिक साहा यांनी घडलेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले असून यामध्ये दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे, मात्र अद्यापही या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही*
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने