सासरी गेलेल्या पतीला पत्नीने पाजले ऍसिड

सासरी गेलेल्या पतीला पत्नीने पाजले ऍसिड

Gujarat crime news

अहमदाबाद - नाराज पत्नीला सासरी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

india crime
सासरी गेलेल्या जावयाला पाजले ऍसिड


प्रल्हाद भाई वाघेला असे मृतकाचे नाव आहे, वर्ष 2010 ला शिल्पा सोबत प्रल्हाद यांचा विवाह झाला होता, प्रल्हाद व शिल्पा यांना 2 मुली आहे.

अहमदाबाद येथील मधुपुरा भागात गीता मंदिराजवळ राहणारे प्रल्हाद वाघेला यांची पत्नी अनेक दिवसांपासून माहेरी गेली होती, पती-पत्नी मध्ये वाद झाल्याने त्या रागाच्या भरात घरून निघून गेल्या होत्या.

प्रल्हाद यांनी अनेकदा विनंती केल्यावरही शिल्पा घरी येत नसल्यानेइ प्रल्हाद हे स्वतः 11 ऑगस्टला शिल्पा ला आणायला सासरी गेले असता त्याठिकाणी पुन्हा पत्नीसोबत त्यांचा वाद होत कडाक्याचे भांडण झाले.

भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले असता पत्नी, सासू, सासरे व मेव्हण्याने प्रल्हाद यांना जबर मारहाण केली, त्यानंतर चौघांनी मिळून प्रल्हाद यांना जबरदस्तीने ऍसिड पाजले.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, प्रल्हाद ला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात मारहाण व ऍसिड मुळे प्रल्हाद यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने