तरुणीला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले

तरुणीला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले

Dadar railway station

मुंबई - मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनवरून एक तरुण रेल्वेतील महिलांच्याया डब्यात शिरला मात्र त्याने डब्यातील एका तरुणीचा विनयभंग करीत तिच्याजवळ असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करीत तिला धावत्या रेल्वे मधून बाहेर फेकले.
या घटनेत तरुणी बचावली याबाबत रीतसर तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही च्या साहाय्याने आरोपी तरुणाला अटक केली.

dadar railway station
धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले बाहेर


पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस मधील महिलांच्या डब्यात हा प्रकार घडला, पीडित तरुणी ही पुण्यावरून मुंबई कडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस मधील महिलांच्या डब्यात बसली होती, रात्री 8 ते साडे आठ वाजताच्या सुमारास ही गाडी दादर रेल्वे स्थानकावर पोहचली.




त्यावेळी एक तरुण महिलांच्या डब्यात शिरला, त्याने सदर पीडित तरुणीचा विनयभंग करीत तिच्याजवळ असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने त्याला न घाबरता प्रतिकार केला, आता आपण पकडले जाणार या भीतीने त्या तरुणाने पीडित तरुणीला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले.


मात्र सुदैवाने तरुणी बचावली, याबाबत पोलिसात तक्रार दिल्यावर, तात्काळ रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही तपासण्यात आले, त्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने