क्षुल्लक वादातून युवकाची हत्या

क्षुल्लक वादातून युवकाची हत्या

Bhandara murder news



भंडारा : राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी पोलीस विभागाला आव्हान देत आहे, क्षुल्लक वादात आज कुणी कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही आहे, अशीच एक घटना विदर्भातील भंडारा जिल्ह्यात घडली.


bhandara crime news
जुन्या वादात युवकाची हत्या


आठवड्याभरापूर्वी 25 वर्षीय अभिषेक कटकवार या युवकाचा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात काही युवकांसोबत वाद झाला होता.

वाद झाला मात्र त्यानंतर त्या वादाचा निपटारा झाला मात्र पुढील युवकांनी तो वाद मनात ठेवत युवकाला संपवायचे ठरविले. 22 ऑगस्टला मंगळवारी मध्यरात्री नंतर हे हत्याकांड घडले. अभिषेक ची तलवारीने भोसकत दगडाने ठेचत त्याची हत्या केली.

या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तलावारीसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. आठ दिवांपूर्वी मृतकाचे काही तरुणांसह जिल्हा सामान्य रुग्णालय परीसरात वाद झाला होता. याच वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. मृतक अभिषेक हा भंडारा शहरातील टप्पा मोहल्ला येथील रहिवाशी आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र, पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून भंडारा पोलीस अधिक तपास करीत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने