चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला रेकॉर्डवरील बादशाह

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला रेकॉर्डवरील बादशाह

Chandrapur local crime branch

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्थानीक गुन्हे शाखेला घरफोडी प्रकरणे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरविली असता 3 पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे यश स्थानिक गुन्हे शाखेला मिळाले.


Chandrapur local crime branch


महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करीत तपास कामी लावले, 23 ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर येथे गेले होते.
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर वर रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आढळले, त्यांची चौकशी केली असता ते दोघे जवळ असलेले सोन्या-चांदीचे दागिने व LED टीव्ही विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती दिली.

सदर मुद्देमाल हा गोंडपीपरी, वणी जी.यवतमाळ व भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या घरफोडीचा असल्याचे दोघांनी कबुल केले.
स्थानिक गुन्हे शाखेने 26 वर्षीय सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. सोमनाथपुरा राजुरा व 18 वर्षीय मोईन उर्फ फैजान शरीफ शेख रा. कमलानगर, वडसा यांना अटक केली.

आरोपी जवळून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व LED TV असा एकूण 1 लाख 3 हजार 671 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सपोनि नागेशकुमार चातारकर, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गौहोकार, मुजावर अली, मिलिंद जांभुळे, सतीश बगमारे, नरेश डाहूले, रुषभ बारसिंगे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने