मुलांनी आई ला पाजले विष

मुलांनी आई ला पाजले विष

Akola crime news

अकोला - शेती व घराच्या जागेवरून वाद विकोपाला गेला आणि कुटुंबातील मुलांनी वडिलांच्या मदतीने आई ला विष पाजले.
या प्रकरणी आई ची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Akola crime news


जिल्ह्यातील बोरगाव येथील म्हैसांग येथे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी हादरुन गेले आहे. वंदना भीमराव गवई असे पीडित महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही मुलं, सुना व पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वंदना यांच्याकडे 5 एकर शेती व घर नावावर आहे, घर व शेती मुलांनी आपल्या नावावर करण्यासाठी अनेकदा आईसोबत वाद घातला होता.

अखेर हा वाद विकोपाला गेला, आई घर व शेती नावावर करून देत नसल्याने दोन्ही मुलांनी वडिलांसोबत मिळून आईला विष पाजले, त्यानंतर पतीने वंदना यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, यामधून वंदना बचावल्या, शेजाऱ्यांनी त्याना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
जागेच्या छोट्या तुकड्यासाठी मुलांनी आईला विष पाजल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने