सॉफ्टवेअर इंजिनिअर निघाला सैतान

सॉफ्टवेअर इंजिनिअर निघाला सैतान

Hyderabad crime news

हैद्राबाद - पती-पत्नीच्या वादात पतीने अमानवीय कृत्य केल्याची धक्कादायक बाब हैद्राबाद येथे घडली आहे.

crime news
अमानवीय घटना निर्दयी बाप


पती-पत्नी मध्ये वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आणि सोबत 9 वर्षीय मुलीला घेऊन गेल्याने पतीचा राग अनावर झाला, रागाच्या भरात 9 वर्षाच्या मुलीची पेन्सिल कटरने हत्या केली. चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत पुढचा आमदार कांग्रेस पक्षाचा - विजय वडेट्टीवार

शहरातील मध्यवर्ती भागात सदर घटना घडली, आधी अनेकांना ही घटना अपघाताची वाटली मात्र सदर अपघात संशयास्पद होता आणि हत्येचं बिंग फुटलं.

चंद्रशेखर व त्याची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात, दोघांना 9 वर्षीय मोक्षज्ञया नावाची मुलगी आहे. मागील काही दिवसांपासून पती-पत्नी मध्ये वाद सुरू होता, त्या कारणामुळे पती-पत्नी वेगळे राहत होते.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून चंद्रशेखर कंटाळला होता, एकदिवस चंद्रशेखर मुलीच्या शाळेत गेला, त्याने मुलीला सोबत घेत कार मध्ये बसविले, त्यानंतर चंद्रशेखर याने आपल्याच मुलीचा पेन्सिल कटरने गळा चिरला, मुलगी वेदनेने विव्हळत राहिली मात्र निर्दयी बापाला तिची दया आली नाही.

मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चंद्रशेखर निघाला होता मात्र वाटेत त्यांची कार डिव्हाईडर वर चढल्याने अपघात झाला, नागरिक मदतीसाठी धावले असता कार च्या मागील बाजूस मुलीचा मृतदेह दिसला, कार मध्ये रक्ताचे डाग पसरले होते, नागरिकांना संशय येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत निर्दयी बाप चंद्रशेखर ला अटक केली.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने