अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

The maharashtra crime

हिंगोली - अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे, याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली.

Rape minor girl


17 ऑगस्टला अल्पवयीन मुलासह चार जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होते, याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बावनखोली भागात अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबीय राहतात, 16 ऑगस्टला कुटुंबीय शेतात कामावर गेले होते, त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती, याची संधी साधत बाजूला राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने जबरदस्ती करीत त्या मुलीवर अत्याचार केला.

सायंकाळच्या सुमारास आई-वडील घरी आल्यावर अल्पवयीन मुलीने अत्याचाराबाबत त्यांना सांगितले, यावरून मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबाला जाब विचारला असता पीडितेच्या कुटुंबियाला मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, गुरुवारी अल्पवयीन मुलांसहित 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने