चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात 52 पत्त्यांचा खेळ

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात 52 पत्त्यांचा खेळ

Chandrapur gambling crime

चंद्रपूर/भद्रावती - बराज तांडा येथील जंगल परिसरात जुगार बहाद्दरांच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Chandrapur gambling news


गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी बराज तांडा येथे जंगल परिसरात धाड मारली असता त्याठिकाणी 5 जुगार बहाद्दर 52 पत्त्याचा खेळ खेळत होते, यावेळी रोख 30 हजार, 4 दुचाकी वाहन असा एकूण 3 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.


ताब्यात घेण्यात आलेल्या या पाच आरोपींवर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना सुचनापत्र देत सोडण्यात आले. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात अनुप आष्टणकर , शशांक बद्दमवार,विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, जगदीश झाडे आदींनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने