PUB-G च्या नादात मुलाने केली आई-वडिलांची हत्या

PUB-G च्या नादात मुलाने केली आई-वडिलांची हत्या

Pubg murder

झाशी - इंटरनेट चा डेटा कमी किमतीमध्ये मिळाल्याने आज अनेकांना गेम चे व्यसन लागले आहे, Pub-G गेम ला बॅन केल्यावर सुद्धा VPN द्वारे आजही तो गेम युवक खेळत आहे.
मात्र त्या गेमने झांशी येथील अख्ख कुटुंब उध्वस्त केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

PUB-G MOBILE GAME
मृतक आई-वडील


नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पिचोरे भागात प्रसाद कुटुंब वास्तव्यास होते, 3 बहीण व 1 भाऊ, आई-वडील असं कुटुंब अनेक वर्षांपासून पिचोरे भागात राहत होते.

मात्र PUB-G च्या नादात कुटुंबातील 26 वर्षीय अंकित प्रसाद याने आई-वडिलांची हत्या केली, त्याला गेम खेळण्यास आई - वडील मनाई करीत होते, त्या रागातून अंकित ने आई 55 वर्षीय विमला प्रसाद व वडील 58 वर्षीय लक्ष्मी प्रसाद यांची हत्या केली.

इतकेच नव्हे तर आई-वडिलांची हत्या केल्यावर अंकित ने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, दोघांना मारल्यानंतर अंकित ने अंघोळ करीत कपडे बदलले व पुन्हा तो मोबाईल वर गेम खेळू लागला, पोलिसांना याबाबत सूचना मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात आई-वडील पडले होते तर अंकित हा बाजूला बसून होता, अंकित पोलिसांना बघून हसला.

अंकित ने याआधी सुद्धा आई-वडिलांना मारहाण केली होती, नेहमी त्याला गेम खेळण्यापासून आई-वडील मनाई करीत होते, त्याचा राग अंकित च्या मनात होता, शनिवारी रात्रीच्या सुमारास अंकित ला गेम खेळू नको असे म्हटल्यावर त्याने आई-वडिलांना मारहाण केली.

वडिलांना आधी संपविल्यानंतर अंकित ने आई ला सुद्धा मारले, लक्ष्मी प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला होता मात्र आई जखमी अवस्थेत रडत होती, आई च्या वेदनेची सुद्धा अंकित ला जाणीव झाली नाही.

सकाळी मोठी बहीण आई-वडिलांना फोन लावत होती मात्र समोरून कुणाचा प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्याला घरी पाठविले असता ही घटना उघडकीस आली.

कोरोना मध्ये अंकित ची नोकरी गेली, त्यानंतर त्याला मोबाईल चे व्यसन जडले, तो सतत मोबाईलवर पब्जी गेम खेळायचा मात्र त्याच्या या व्यसनाने अख्खा कुटुंब उध्वस्त झाले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने