कुत्र्यावर एसिड हल्ला

कुत्र्यावर एसिड हल्ला

Mumbai acid attack

मुंबई - आजपर्यंत एकतर्फी प्रेमातून मुलीवर एसिड फेकणाऱ्या अनेक घटना घडल्या आहे, मात्र मांजरी सोबत खेळणाऱ्या एका कुत्र्यावर महिलेने एसिड टाकल्याची घटना घडली असून याप्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

acid attack mumbai
महिलेने केला कुत्र्यावर एसिड हल्ला


मुंबई पश्चिम उपनगर येथील मालाड मालवणी भागात ही घटना घडली, कुत्र्याच्या चेहऱ्यावर एसिड मुळे त्याचा एक डोळा निकामी झाला आहे.

सामना नगर भागातील स्वप्नपूर्ती इमारतीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय सबीस्ता सुहेल अन्सारी या महिलेने घरी मांजर पाळली आहे, त्या मांजरी सोबत सोसायटी मधील कुत्रा नेहमी खेळायचा, त्या मांजरी च्या पाठीमागे सुद्धा तो कुत्रा धावायचा, नेहमी मांजरी च्या मागे लागतो याचा राग सबीस्ता यांना आला होता.

बुधवारी रात्रीच्या सुमारास सबीस्ता ने इमारतीच्याया गेटजवळ बसून असलेल्या कुत्र्यावर एसिड फेकले, कुत्रा रात्री भुंकत व किंचाळत असल्याने सोसायटीमधील बाळासाहेब भगत यांनी जाऊन बघितले असता कुत्रा जखमी अवस्थेत किंचाळत होता.

त्याला तात्काळ पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र एसिड चेहऱ्यावर पडल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला, टीव्ही अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी thank u earth या NGO मध्ये दाखल केले.

आरोपी सबीस्ता वर मालवणी पोलोस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने