चंद्रपुरात गोवंश मासाची विक्री

चंद्रपुरात गोवंश मासाची विक्री

चंद्रपूर crime

चंद्रपूर - मुखबिर च्या माहितीनुसार चंद्रपूर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी 20 ऑगस्टला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश मास विक्री होत आहे, पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली असता 2 क्विंटल गोवंश मास हाडे व इतर साहित्य मिळून आले.

Illegal beef


चंद्रपूर शहरातील रहमतनगर येथील काही लोक गोवंश मासाची अवैध विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली, 69 वर्षीय शेख जलील शेख कादर कुरेशी रा. रहमतनगर यांच्या घरा पुढे असलेल्या टिनाच्या शेड ची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना 2 क्विंटल गोवंश मास व इतर साहित्य जप्त केले.

टिनाच्या शेड मध्ये असलेल्या व सार्वजनिक मास विक्री मुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूषित परिणाम होत होता, टिनाच्या शेड मध्ये मास व्यतिरिक्त 3 वर्षीय पांढऱ्या रंगाचा गोरा व 4 वर्षीय पांढऱ्या रंगाची गाय अत्यंत क्रूरतेने बांधून ठेवले होते.

सदर प्रकरणी 69 वर्षीय शेख जलील शेख कादर कुरेशी, 35 वर्षीय शेख अकिल शेख जलील कुरेशी व 44 वर्षीय सत्तार वहाब कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपिकडून गोवंश मास व साहित्य पकडून तब्बल 40 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने