चंद्रपूर शहरात अत्यंत संतापजनक प्रकार उघड

चंद्रपूर शहरात अत्यंत संतापजनक प्रकार उघड

Chandrapur crime news

चंद्रपूर - चंद्रपूर शहरात 17 ऑगस्टला संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, या घटनेमुळे शेजार धर्मावर किती विश्वास ठेवायचा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

shocking crime chandrapur
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ


चंद्रपूर शहरातील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 37 वर्षीय विवाहीत पुरुषाने लैंगिक छळ केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे आरोपीला 11 वर्षीय मुलगा आहे, आरोपी व पीडित एकमेकांच्या घरापुढे राहतात, शेजारी असल्याने आरोपीचे पीडितेच्या घरी येनेजाणे होते, 17 ऑगस्टला पीडित मुलगी घरी एकटी असल्याने आरोपीने डाव साधत तिचा लैंगिक छळ केला.

अल्पवयीन मुलीचे आई-वडील घरी आल्यावर ही बाब मुलीने सांगितली, आई-वडिलांनी तात्काळ याबाबत चंद्रपूर शहर पोलिसात तक्रार दिली, पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या या गुन्ह्यात आरोपिवर पोकसो व 376 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दारू हा पिल्यावर असे प्रकार त्या अल्पवयीन सोबत करण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल थुल करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने