Youtube बघून पतीने केली पत्नीची प्रसूती

Youtube बघून पतीने केली पत्नीची प्रसूती

Tamilnadu shocking incident

तामिळनाडू - आजच्या वेगवान युगात नवं काही शिकायचं असेल तर त्याची सर्व सामुग्री youtube सारख्या समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे, मात्र ती व्यवस्थित व्हायला काही कठीण असते, पण एकाने youtube बघून स्वतःच्या बायकोची प्रसूती केल्याची घटना घडलीय, धक्कादायक म्हणजे प्रसूती करताना त्या महिलेचा मृत्यू झाला.

Husband gave birth to his wife by watching youtube
पतीने youtube बघत पत्नीची केली प्रसूती


तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी मध्ये राहणाऱ्या मधेश व लोगनायकी दाम्पत्य राहत होते, मधेश ची पत्नी लोगनायकी ही गर्भवती होती, मधेश ला youtube वरील व्हिडीओ बघण्याचा खूप छंद होता.

प्रसूती कशी करतात याबाबत त्याने अनेक व्हिडीओ बघितले होते, अचानक लोगनायकी ला प्रसावकळा सुरू झाल्या मात्र मधेश ने तिला रुग्णालयात न नेता घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला, youtube वर जे व्हिडीओ मधेश ने बघितले त्या व्हिडीओ वरून तो पत्नीची प्रसूती करू लागला.

प्रसूती दरम्यान लोगनायकी चा रक्तस्राव सुरू झाला, त्यामुळे ती बेशुद्ध पडली, मधेश ने बाळाला व्यवस्थित बाहेर काढले मात्र त्याने नाळ व्यवस्थित कापली नाही, यामुळे त्याच्या पत्नीला अति रक्तस्राव झाला.

मधेश ने पत्नीला बेशुद्ध झाल्यावर रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, पोलिसांनी कलम 174 अंतर्गत मधेश वर गुन्हा दाखल केला आहे, पोलीस तपासात मधेश ने youtube बघून पत्नीची प्रसूती केल्याची बाब निष्पन्न झाली तर मधेश वर अटकेची कारवाई होऊ शकते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने