भाजयुमो जिल्हाध्यक्षावर गोळीबार

भाजयुमो जिल्हाध्यक्षावर गोळीबार

Shootouts at hingoli

हिंगोली - हिंगोली येथील भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद आवारात अज्ञात 2 जणांनी गोळीबार केला, चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल 3 गोळ्या झाडल्या, चव्हाण यांच्या पाठीवर गोळी लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

shootout hingoli
गोळीबारानंतर घटनास्थळी पोलिसांचा जमलेला ताफा


गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, फुटेज च्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता त्याठिकाणी त्यांना एक मोबाईल आढळला, त्या नंबरवर सतत व्हाट्सएप कॉल द्वारे संभाषण सुरू होते, पोलिसांनी व्हाट्सएप कॉल करणार्यांचा शोध सूरु केला आहे.

भाजयुमो जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना उपचारासाठी नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे, त्यांच्या पाठीवर 2 गोळ्या लागल्या आहे, गोळीबार का झाला याचा तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने