एअर बॅग खुलले आणि त्यांचे प्राण वाचले

एअर बॅग खुलले आणि त्यांचे प्राण वाचले

Accident news



चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील आर्वी गावा जवळ असलेल्या दर्ग्याजवळ 1 ऑगस्ट ला रात्री 8 वाजता कार व ट्रकचा अपघात झाला.

अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली असून एका महिलेला किरकोळ मार लागला आहे, झालेल्या भीषण अपघातात कारचे इंजन व समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला दैव बलवत्तर असल्याने वेळीच कार मधील एअरबॅग खुलल्याने कार मधील दोघांचाही जीव वाचला


horrible accident chandrapur
नशीब बलवत्तर


नांदा फाटा येथील सुमेंद्र ठाकूर यांचा अनेक वर्षापासून प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय आहे. त्याचेकडे होंडा कंपनीची औरा मॉडेल ही गाडी आहे. गाडीचा वाहन क्रमांक एम. एच. 34 बी. आर. 9768 आहे.


मिळालेल्या माहीती नुसार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास नांदाफाटा येथील तिरुपती शंकर भीमेकर हा सु्मेंद्र ठाकूर यांची गाडी घेऊन काही कामानिमित्त चंद्रपूर येथे जात होता आर्वी गावा नजदीक असलेल्या दर्ग्यासमोर राजुराकडून येणाऱ्या ट्रक व कार मध्ये जोरदार टक्कर झाली.

भयंकर अपघातामध्ये कारचे इंजन व समोरील भाग पूर्णतः चकनाचूर झाला सुदैवाने वेळीच एअर बॅग खुलल्याने जीवित हानी झाली नाही, अपघातात चालक तिरुपती शंकर भिमेकर, नांदाफाटा याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे डोळ्याला जबर मार लागला सध्या त्याचेवर नागपूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

चालक तिरुपती भिमेकर याची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती आहे, गाडीमध्ये असलेल्या महिलेला किरकोळ दुखापत झाली असून राजुरा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचारा नंतर तिला सुट्टी देण्यात आली आहे.
अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला अपघाता प्रकरणी राजुरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.


राजुरा ते कोरपना हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला असल्याने महामार्ग बनविण्याचे काम जोरात सुरू आहे, पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघात टाळण्यासाठी वाहने वेगाने चालवू नये दैव बलवत्तर असल्याने वेळीच कारमधील एअरबॅग खुलल्यामुळे प्राण वाचले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने