कानफटात मारली म्हणून त्याने कानावर गोळी झाडली

कानफटात मारली म्हणून त्याने कानावर गोळी झाडली

Delhi shootout news

नवी दिल्ली - मंगळवारी रात्री Amazon च्या सिनियर मॅनेजरची गोळ्या झाडून अज्ञातांनी हत्या केली होती, त्याबाबत पोलिसांना यश आलं असून हत्या करणारा आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Amazon india
harprit Gill


मंगळवारी रात्री हरप्रित गिल हा आपल्याया काका सोबत घराकडे जाण्यासाठी निघाला होता, ते घरा जवळील वळणावर पोहचले असताना अज्ञातांनी त्यांची दुचाकी थांबवित गोळीबार सुरू केला, या गोळीबारात हरप्रित यांच्या डोक्यात गोळी लागली सोबत हरप्रित चा काका गोविंद सिंग सुद्धा या हल्ल्यात जखमी झाला होता.

पोलिसांनी घटनेनंतर तपासाची चक्रे फिरवली असता आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली, आरोपीचे वय 18 वर्षे आहे, मागच्या महिन्यात हरप्रित चा आरोपीच्या साथीदारासोबत वाद झाला होता, या वादात हरप्रित ने आरोपीच्या मित्राला कानशिलात लगावली होती.

या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी व त्याच्यासोबत असलेल्या 4 जणांनी हा कट रचला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा 3 खुनाच्या गुन्ह्यात सहभागी आहे, तो नव्याने उदयास येत असलेल्या माया गॅंग चा सदस्य सुद्धा आहे.

आपल्या साथीदाराला कानशिलात लगावल्याने आरोपीने हरप्रित च्या कानावर गोळी मारली ती गोळी डोक्यात घुसून दुसऱ्या बाजूने निघाली होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने