चंद्रपुरात शिक्षणात हुशार विद्यार्थी निघाला चोर

चंद्रपुरात शिक्षणात हुशार विद्यार्थी निघाला चोर

Chandrapur crime update

चंद्रपूर - शहरात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडीच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे, चंद्रपूर पोलीस या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यास यशस्वी ठरत आहे.

Chandrapur crime


रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली या प्रकरणात आयुर्वेदिक औषधी विक्रेता 45 वर्षीय कुलदीप कुमार गुप्ता रा. शास्त्रकार ले-आऊट चंद्रपूर यांच्या घरी अज्ञातांनी प्रवेश करीत 1 लाख 11 हजार 500 रुपयेचा मुद्देमाल ज्यामध्ये रोख व सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता, त्यावर डल्ला मारला.

11 ऑगस्टला गुप्ता यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे व पोउपनी मधुकर सामलवार यांनी सदर प्रकरणचा तपास सुरू केला.

घटनास्थळाचा पंचनामा करीत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढण्यात आले, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी गवसला.

आरोपी हा 25 वर्षीय आशिष उर्फ आशु रेडीमल्ला रा. रयतवारी कॉलरी येथील असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, आरोपी आशिष जवळून पोलिसांनी तब्बल 1 लाख 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपी चा हा दुसरा गुन्हा असल्याची माहिती आहे, वर्षभरापूर्वी सुद्धा आशिष ने असाच गुन्हा केला होता, त्यावेळी त्याला पोलिसांनी अटकही केली होती, आशिष हा अभ्यासात हुशार असून एक चांगला फुटबॉल पटू आहे, त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे हे विशेष.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या सहकार्याने सपोनि हर्षल एकरे, पोउपनी मधुकर सामलवार, गुन्हे शोध पथक व सायबर पोलिसांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने