19 वर्षीय युवकाने चंद्रपुरात आणला देशी कट्टा

19 वर्षीय युवकाने चंद्रपुरात आणला देशी कट्टा

Chandrapur crime

चंद्रपूर - जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत आहे, विशेष म्हणजे अल्पवयीन व कमी वय असलेले मूल गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Chandrapur police


असाच एक प्रयत्न चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला आहे, 19 वर्षीय मुलाने चंद्रपूर तालुक्यात देशी कट्टा आणत दहशत निर्माण करण्याची सुरुवात करणार पण त्याआधी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथील बँक ऑफ इंडिया च्या मागे राहणारा 19 वर्षीय संतोष उर्फ कुट्टी राजकुमार रॉय याने देशी कट्टा आणला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.


माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने संतोष च्या घरी धडक देत झडती घेतली असता त्यांना देशी बनावटीचा कट्टा किंमत 5 हजार आढळून आला, त्याने कट्टा का आणला? याचा पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.

आरोपी संतोष जवळ आढळलेला हा कट्टा त्याने कुठून आणला? त्याचा उपयोग तो कुठे करणार होता? याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनी विनोद भुरले, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, गोपाल आतकुलवार व नितीन रायपुरे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने