सहायक पोलिस आयुक्ताने कुटुंबावर केला गोळीबार

सहायक पोलिस आयुक्ताने कुटुंबावर केला गोळीबार

Pune firing
पुणे - अमरावती पोलीस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत भारत गायकवाड यांनी पत्नी व पुतन्यावर गोळीबार करीत स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली, ही खळबळजनक घटना पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली.

Committed suicide by shooting at the family
firing pune


या गोळीबारात पत्नी 44 वर्षीय मोनि गायकवाड व पुतण्या 35 वर्षीय दीपक गायकवाड यांचा मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच चतुशृंगी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अमरावती येथील राजपेठ विभागात भारत गायकवाड हे सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते, तर त्यांचे कुटुंब हे पुण्यात वास्तव्याला होते, सुट्टी मिळाली की ते पुणे ला कुटुंबाकडे जायचे.

शनिवारी रात्री ते पुण्यात आले होते, मात्र घरी पोहचताच नेमकं काय घडलं की भारत गायकवाड यांनी बंदुकीने पत्नी व पुतण्यावर गोळ्या झाडल्या, या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, त्यांनतर गायकवाड यांनी स्वतःवर सुद्धा गोळीबार करीत आत्महत्या केली.

गायकवाड यांचं कुटुंब पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास होते, त्यांच्या कुटुंबात पत्नी-पुतण्या व 2 मुले असा परिवार होता.
या घटनेमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने