17 वर्षाच्या मुलाचा हट्ट ठरला जीवघेणा

17 वर्षाच्या मुलाचा हट्ट ठरला जीवघेणा

Chandrapur suicide news
चंद्रपूर - वडीलाने दुचाकी वाहन दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलाने गळफास लावत आत्महत्या केली, सदर घटना चंद्रपूर शहरातील माता नगर येथील भिवापूर वार्डात घडली.
Shocking news chandrapur




मृतक मुलाचे नाव 17 वर्षीय प्रियांशु निर्दोष जयकर असे आहे, 9 जुलै ला प्रियांशु ने वडिलांना दुचाकी वाहन मागितले होते, वडिलांनी त्याला नकार देत कशाला वाहन हवं, रिकामा फिरत जाऊ नको असे म्हणत त्याला दुचाकी दिली नाही.



प्रियांशु त्यादिवशी पायदळ बाहेर गेला, त्याने हातावर ब्लेडने वार केले, वडीलाने त्याच्या हातावर बघितले असता बापाचं काळीज हादरलं, दुसऱ्या दिवशी 10 जुलै ला वडीलाने प्रियांशु ला दुचाकी दिली, मात्र त्याच्या मनात राग होता आणि तो राग त्याने संपूर्ण मनावर घेत मोठं पाऊल उचलले.
वडील कामावर गेले असता सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणी नसताना प्रियांशु ने गळफास घेत आत्महत्या केली.



शेजाऱ्यांनी प्रियांशु ला खाली उतरवून तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, प्रियांशु ने एका हट्टापायी आपला जीव गमावला, प्रियांशु नुकताच 12 वि ची परीक्षा पास झाला होता.

त्याच्या या जीवघेण्या हट्टापायी जयकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, घटनेचा पुढील तपास महाकाली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने