Chandrapur crime news
चंद्रपूर - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्याकडून 2 दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या चोराची विशेष बाब म्हणजे त्याने 1 दुचाकी चोरल्यावर ती पद्मापूर येथील जंगलात लपून ठेवली होती.
11 जुलै ला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की एक संशयित चंद्रपूर बस स्थानक परिसरात दुचाकी विक्री साठी ग्राहक शोधत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी पोहचत प्रणय खोब्रागडे रा. पदमापूर याला ताब्यात घेत विचारपूस केली.
त्याच्याजवळ असलेल्या दुचाकी वाहनांच्या कागदपत्राबाबत प्रणय ला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली, त्यानंतर त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर दुचाकी ही चोरीची असल्याचे सांगितले.
मागील आठवडाभरा पूर्वी चंद्रपुरातील शास्त्रीनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोरून वाहन क्रमांक MH34BJ2483 हिरो स्पलेंडर चोरी केले होते, तर जंगलातून जप्त करण्यात आलेले दुचाकी वाहन क्रमांक MH34AH1257 पल्सर ही राजुरा शहरातील रामनगर परिसरातून चोरी केली होती.
दुचाकी चोरीबाबत चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशन व राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे, आरोपी प्रणय खोब्रागडे याला ताब्यात घेत त्यांच्याजवळून 2 दुचाकी असा 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संतोष एलपुलवार, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे, गोपाल आतकुलवार व नरेश डाहूले यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे.
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना गोपनीय