महामार्ग पोलिसांच्या वाहनाला ट्रकने दिली धडक

महामार्ग पोलिसांच्या वाहनाला ट्रकने दिली धडक

Accident news


आर्णी (यवतमाळ) : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय
महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री १: ३० गस्तीवर असताना, कोसदनी घाटाजवळ एका आयशर ट्रकने महामार्ग पोलिसाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात पोलिस शिपाई संजय रंगराव नेटके (४१) व ट्रक चालक पांडुरंग हरी नकाते (५०) यांचा जागीच मृत्यू झाला.

terrible accident
महामार्ग पोलिसांच्या वाहनाला धडक, दोघांचा मृत्यू



ट्रकने दिलेल्या धडकेत २ पोलिसांचा मृत्यू झाला असून इतर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने