दारू घेण्यासाठी 5 रुपये कमी दिले म्हणून एकाची हत्या

दारू घेण्यासाठी 5 रुपये कमी दिले म्हणून एकाची हत्या

Murder news
कोलकाता - दारु खरेदी करण्यासाठी गेलेल्या एकाने दारू दुकानदाराला 5 रुपये कमी दिले म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. India crime

liquor shop murder
मृतक सुशांत मंडल


गरियाहाट रोडवर असलेल्या दारूच्या दुकानात सुशांत मंडल हा दारू घेण्यासाठी गेला होता, दारू घेतल्यावर 5 रुपये कमी दिले म्हणून दुकानातील काम करणारे व सुशांत यांच्यामध्ये बाचाबाची झाली, बाचाबाची इतकी वाढली की त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
दुकानात काम करणाऱ्यांनी सुशांत ला बेदम मारहाण केली, या मारहाणीत सुशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे सुशांत चा मृत्यू झाला.


या घटनेनंतर नागरिकांनी दुकानाची तोडफोड केली, पोलिसांचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती चिघळली नाही, पोलिसांनीसीसीटीव्ही फुटेज च्या आधारे दुकान मालक देबोज्योती साहा, अमित कार, प्रभात दत्ता व प्रसन्न जित बैध यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने