देशातील विविध व्याघ्रप्रकल्पात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक

देशातील विविध व्याघ्रप्रकल्पात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक

Tiger hunting

चंद्रपूर - 28 जून ला गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील 3 व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती. तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व व्याघ्रप्रकल्प सभोवताल वाघांची शिकार होत असल्याच्या सूचना 29 जून ला देण्यात आल्या होत्या.

A tiger-hunting tribe
चंद्रपूर वनविभागाची मोठी कारवाई


त्या 3 आरोपीनी चंद्रपूर व गडचिरोली या भागात वाघाची शिकार केली काय? याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांनी 3 सदस्यीय पथक गुवाहाटी येथे पाठविले.
त्या आरोपी जवळून शिकारी बाबत माहिती घेतली असता गडचिरोली येथे टोळीमधील काही सदस्य वाघाच्या शिकारी साठी वावरत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्या टोळीमधील सदस्यांवर मेळघाट व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर व गडचीरोली वनवृत्त व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संशयितावर पाळत ठेवली.

23 जुलै ला संयुक्त चमू ने गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथे मध्यरात्री संशीयितांच्या ठिकाणी छापा टाकला असता 16 जणांना अटक करण्यात आली, त्याठिकाणी वाघाची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे शिकंजे 6 नग, इतर धारदार शस्त्रे, वाघाची 3 नखे व रोख 46 हजार रुपये जप्त करण्यात आले.


अटक करण्यात आलेल्या मध्ये 6 पुरुष, 5 स्त्रिया व 5 मुलांचा समावेश आहे, चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना जवळून प्राप्त माहितीच्या आधारे करीमनगर, धुळे, व तेलंगणा राज्यातून संशियताना ताब्यात घेण्यात आले.
सर्व संशयित हरियाणा व पंजाब राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले, या टोळक्याने देशातील अनेक भागात वाघांची शिकार केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक गडचिरोली यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीच्या आधारे संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या टोळीवर कारवाईमुळे चंद्रपूर, गडचिरोली व तेलंगणा राज्यातील वाघांची शिकार करण्याचा मोठा कट वनविभागाने हाणून पाडला आहे. या संपूर्ण कारवाई तेलंगणा वनविभागाचे मोठे मार्गदर्शन लाभले आहे.

आतापर्यंत संशयित आरोपी म्हणून तब्बल 14 जणांना अटक करण्यात आली असून या शिकार प्रकरणी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती क्षेत्र संचालक ताडोबा जितेंद्र रामगांवकर यांनी News34 सोबत बोलताना दिली.
सदरची कारवाई प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महिप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, जितेंद्र रामगांवकर, रमेशकुमार, रवींद्र सिंह पोलीस अधीक्षक चंद्रपूर, निलोत्पन पोलीस अधीक्षक गडचिरोली व इतर अधिकाऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने