चंद्रपुरातील 2 सख्खे भाऊ निघाले अट्टल गुन्हेगार

चंद्रपुरातील 2 सख्खे भाऊ निघाले अट्टल गुन्हेगार

Chandrapur burglary crime

चंद्रपूर - रामनगर पोलिसांच्या धाडसी कारवाई नंतर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सुद्धा 2 सख्ख्या भावांना घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल 9 घरफोड्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

chandrapur burglary news
घरफोडीच्या 9 गुन्ह्यातील 2 सख्ख्या भावांना अटक


17 जून रोजी वांढरी फाटा पडोली येथे श्रीकांत अधिकारी हे जेवण केल्यावर कुटुंबासाहित हॉल मध्ये झोपले असता रात्रीच्या सुमारास अज्ञाताने बेडरूमच्या खिडकीची ग्रील वाकवून प्रवेश केला असता बेडरूम मध्ये असलेल्या लॉकर मधील सोन्या चांदीच्या दागिन्यांसहित 1 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेले.


याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरण व जिल्ह्यात घडणाऱ्या घरफोडीचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाला गती देत ज्याठिकाणी घरफोडी च्या घटना घडल्या तिथे जात सविस्तर माहिती घेतली व रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत सुद्धा माहिती घेण्यात आली.

त्यासुमारास स्थानिक गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील घरफोडी करणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळाली, सदर गुन्हेगार हा संशयित रित्या रयतवारी कॉलरी उभा असून तो सोन्याचे दागिने विकण्याकरिता आला आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत विचारपूस केली व पडोली येथे झालेल्या घरफोडी बाबत सुद्धा विचारणा केली असता त्याने तो गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपी नामे प्रभू सुब्रमण्यम सानिपती व त्याचा सख्खा भाऊ राकेश सुब्रमण्यम सानिपती यांना अटक करण्यात आली.

दोन्ही भावांनी मिळून पडोली 3, दुर्गापूर 1, भद्रावती 2, वरोरा 3 अश्या तब्बल 9 घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हे शाखेने आरोपीजवळून सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा एकूण 6 लाख 8 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, गजानन नागरे, संतोष एलपूलवार, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, अजय बागेसार व सायबर पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने