चंद्रपुर जिल्ह्यात काकाने मित्रांसोबत मिळून केली पुतण्याची हत्या

चंद्रपुर जिल्ह्यात काकाने मित्रांसोबत मिळून केली पुतण्याची हत्या

Chandrapur murder

ब्रम्हपुरी:- राज्यात एकीकडे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात घमासान माजले आहे, आमदार पुतणे अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारत पक्ष फोडण्याचे काम करीत थेट भाजपसोबत हातमिळवणी केली.
राज्यात पुतणे विरुद्ध काका चा वाद मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात काका ने पुतण्याची मित्राच्या साहाय्याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

क्षुल्लक वादातून काकाने मित्रांसोबत मिळून पुतण्याची चाकुने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी येथे घडली.
या घटनेमुळे ब्रम्हपुरी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुजरी वार्ड चौकात ४ जुलै च्या रात्री १०:३० वाजता दरम्यान ही घटना घडली.

kapil bhaisare murder chandrapur
मृतक कपिल भैसारे


कपील खुशाल भैसारे वय (२२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मुन्ना राऊत वय (४५)वर्ष व रोहित भैसारे वय (३२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे आरोपी चे नाव आहे. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना ब्रम्हपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

4 जुलै ला रात्रीच्या सुमारास कपील भैसारे व काका रोहित भैसारे त्याचा मित्र मुन्ना राऊत, हे तिघेही दारू पीत गुजरी वार्ड चौकात बसुन आपआपसात चर्चा करत होते. या चर्चेत दोघांचा कपिल सोबत वाद झाला, मुन्ना राऊत व काका रोहित यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या कडे असलेल्या धारधार चाकुने कपील भैसारे च्या छातीवर दोन ते तिन वार केले.

कपिल खाली पडल्याने दोघांनी तिथून पळ काढला त्यानंतर काही वेळात कपील भैसारे याचा भाऊ फिरायला बाहेर आला असता कपील हा खाली रक्ताच्या थारोळ्यात पडुन दिसला त्यांने गंभीर जखमी अवस्थेत कपील भैसारे ला ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या 4 तासात अटक केली. सदर आरोपींविरोधात कलम ३०२,३४ भादवी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा ३,२,वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने